Monday, August 2, 2021

मालवण नाभिक सभा : २ ऑगस्ट २१

 आज दिनांक 2/8 /20 21 रोजी सकाळी साडेअकरा वाजता भैरवी देवालयात 4/9/ 2021 रोजी होणाऱ्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथी  कार्यक्रमासंदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी कोकण प्रांत संघटक श्री विजय चव्हाण. तालुकाध्यक्ष श्री.आनंद आचरेकर सचिव अॅड. पलाश चव्हाण. शहराध्यक्ष शुभम लाड. नाभीक सह. पतसंस्था संचालक अॅड.श्री. भाऊ चव्हाण. ज्येष्ठ सल्लागार श्री अरविंद चव्हाण. महिला जिल्हा प्रमुख सौ.  प्रतिभा चव्हाण. मालवण महिला तालुका प्रमुख सौ दीपा शिंदे. तसेच मालवण तालुक्यातील विभाग प्रमुख व समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुढील निर्णय घेण्यात आले.

१) यावर्षी श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी प्रत्येक विभागवार यथाशक्ति साजरी करण्यात यावी. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विभाग प्रमुखानी विभागवार बैठका घेऊन आपापल्या विभागात माहिती पोचवावी. तसेच पुण्यतिथी साजरी करताना सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करावे. शहरातील पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरात कडून गतवर्षी जमलेल्या निधीतून उर्वरित निधी चा वापर करावा. व सर्व शासकीय नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने या वर्षीचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात यावा. 

२) काही दिवसापूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे ज्या ज्या समाज बांधवांना नुकसान सोसावे लागलेले आहे अशा समाज बांधवांना मदतीचा हात म्हणून तालुक्यातर्फे निधी संकलित करण्याचे ठरविण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक कर्त्या पुरुषाने निदान शंभर रुपये एवढा निधी किंवा स्वइच्छे प्रमाणे त्याहून अधिक निधी तालुक्याकडे विभागवार जमा करावा. हा निधी 14 ऑगस्ट पूर्वी प्रत्येक विभागाने जमा करून तालुका अध्यक्षांकडे संकलित करावा.

२) भैरवी देवी मंदिरामध्ये समाजाच्या वतीने जे कार्यक्रम किंवा जा सभा आयोजित केल्या जातात त्या कार्यक्रमांसाठी सभांसाठी लागणाऱ्या टेबल, तांब्या, पेला, टेबलक्लॉथ, खुर्ची अशा वस्तू खरेदी करण्याचे ठरविण्यात आले यासाठी सौ प्रतिभा चव्हाण यांनी स्वतः या सर्व वस्तूंचा खर्च उचलण्याचे घोषित केले. 

४) श्री. संत सेना महाराजांच्या डिजिटल बॅनरच्या प्रतिमेची संकल्पना मांडण्यात आली त्याचबरोबर सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या विषयांवर साधक चर्चा होऊन योग्य ते निर्णय घेण्यात आले. ग्रामीण   विभागातून आचरा विभाग हा निधी संकलन करण्यात गेल्यावर्षी प्रथम क्रमांकावर आहे याबद्दल आचरा विभागाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच उपस्थित सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले. सर्व विषयांना सूचक अनुमोदक याद्वारे अनुमती दिल्यानंतर अध्यक्षीय भाषणाने सभेचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment