नाभिक वारी : कणकवली ते आंगणेवाडी सन 2022
Monday, January 31, 2022
Wednesday, January 12, 2022
सहवेदना
🛑 सहवेदना
मसुरे ( डांगमोडे ) :
येथील 85 वर्षांचे नाभिक समाजाचे दोनशे पन्नास माणसांच्या कुटुंबाचे प्रमुख अर्जुन नारायण चव्हाण यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पत्नीचेही एक वर्षापूर्वी निधन झाले होते. डांगमोडे चव्हाण कुटुंबियांनी आपल्या आई वडिलांची आजारी असताना चांगली सेवा शुश्रुषा केली होती.
सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीनेही कै. अर्जुन नारायण चव्हाण यांना ऑनलाईन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यविधीसाठी त्यांचे सहा मुलगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार , ज्ञातीबांधव , गावकरी उपस्थित होते.
Monday, January 10, 2022
🛑 जावेद हबीब याच्या निंदनीय कृत्याबद्दल जाहीर निषेध : जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर
🛑 जावेद हबीब याच्या निंदनीय कृत्याबद्दल जाहीर निषेध : जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर
🟡 महिलांचा आदर करणे ही आमची संस्कृती : सिंधुदुर्ग नाभिक संघटना
कणकवली :
प्रत्येक हेअर आर्टिस्टने आपल्या कलेचा सदुपयोग केला पाहिजे. प्रसिद्धीच्या नादात कोणतीही निंदनीय कृती करुन इतर हेअर आर्टिस्टच्या भावना दुखवू नयेत. जावेद हबीब नावाच्या हेअर आर्टिस्टने एका सेमिनारमध्ये सर्वांच्या समोर एका महिलेची हेअर कटिंग करताना पाण्याचा स्प्रे मारण्याऐवजी केसांवर प्रत्यक्ष थुंकला आहे. ही कृती अतिशय घृणास्पद असून त्याने अशा प्रकारे केलेल्या कृतीचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत , असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
आपली भारतीय संस्कृती महिलांचा आदर करणारी आहे. शिवाजी महाराजांनीही परधर्मातील महिलांना सन्मान देऊन आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे. आम्ही महिलांचा आदर करतो. आमची महिला संघटना देखील आमच्यासोबत आहे.
जावेद हबीब या माणसाने केलेली कृती आमच्या जिल्हा महिला नाभिक संघटनेलाही संताप आणणारी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा म्हणाल्या , " जावेद हबीब याने केलेला हा महिलांवरील अत्याचारच आहे. याला त्याबद्दल कडक शिक्षा झाली पाहिजे. महिला आयोगाकडून या गोष्टीची चौकशी होऊन पीडित महिलेला योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करीत आहोत. "
राज्य प्रदेश सरचिटणीस राजन पवार , प्रांत संघटक विजय चव्हाण आणि समस्त सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या प्रत्येक तालुका शाखेकडूनही जावेद हबीबच्या या घृणास्पद कृत्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
🛑 वृत्तांकन : प्रवीण कुबल
सचिव , कणकवली तालुका नाभिक संघटना