Thursday, August 13, 2020
Saturday, August 8, 2020
Apron वितरण कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम : राजन पवार
कणकवली : दिनांक : ०८/०८/२०२० :
सध्या ' कोरोना ' प्रादुर्भाव होत असल्यामुळे सलून कारागिरांना अधिक काळजीपूर्वक सेवा द्यावी लागत आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी सुरक्षित सेवा देण्याच्या दृष्टीने ' Use & Throw ' Apron चा वापर करणे गरजेचे झाले आहे. ग्राहकांना आरोग्यपूर्ण व निःशंक सेवा द्यायची असेल तर संघटनेने दिलेली आचारसंहिता पाळायला हवी. याची जाणीव जागृती करण्यासाठी दशरथ चव्हाण , रोशन चव्हाण यासारख्या नाभिक कार्यकर्त्यांची गरज आहे. ते राबवत असलेला उपक्रम स्तुत्य असून दोन हजार पेक्षा जास्त नाभिक व्यावसायिकांना युज अँड थ्रो ची चादर वापरण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष राजन पवार यांनी प्रस्तुत उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
जिल्हा नाभिक संघटना सचिव सुधीर चव्हाण यांच्या जेन्टस पार्लर मध्ये आणि मालवण येथील राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी युज अँड थ्रो Apron च्या वितरणाचा उपक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण , जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , कणकवली सचिव प्रवीण कुबल, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , वेंगुर्ला अध्यक्ष किरण पवार, सावंतवाडी अध्यक्ष वैभव चव्हाण , माजी जिल्हाध्यक्ष सदानंद चव्हाण , जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर. देवगड अध्यक्ष प्रमोद चव्हाण , मालवण अध्यक्ष आनंद आचरेकर, उपक्रमाचे उपक्रमशील शिलेदार दशरथ चव्हाण आणि रोशन चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते.
विजय चव्हाण म्हणाले , दशरथ आणि रोशन चव्हाण या तरुणांच्या योगदानामधून तळागाळातील नाभिक व्यावसायिकांपर्यंत ' युज अँड थ्रो ' चादर वापरण्याविषयीची जाणीव पोहचणार आहे. जिल्ह्यातील २१०० नाभिक व्यावसायिकांपर्यंत सदर साहित्य पोहचणार असल्याने ते साहित्य वापरण्याविषयीची सवय निर्माण होणे या घडीला महत्वाचे आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नाभिक संघटना घराघरात पोहोचणार आहे. इतर तरुणांनी या दोन तरुणांचा आदर्श घ्यावा असे आवाहन करून त्यांना धन्यवाद दिले.
अनिल अणावकर म्हणाले, आम्हाला आमच्या नाभिक बांधवांना चांगले संदेश द्यायचे आहेत, कोणत्याही प्रकारे आपल्या ग्राहकांनी आपल्याला नावे ठेवू नयेत , नावे ठेवलीच तर चांगली ठेवावीत. त्यासाठी आपणच काळाप्रमाणे बदलायला हवे. आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर ग्राहक आपल्याकडे येताना शंका घेतील. त्यांना खुश करणे , त्यांना हवे असे काम करणे हे आपले कर्तव्य आहे. युज अँड थ्रो च्या साहित्याचा वापर सुरु केल्यामुळे दरामध्ये वाढ करावी लागली आहे आणि सध्या ग्राहकांना सुरक्षित सेवा वाटली तर ग्राहक वाढलेल्या दरपत्रकाचा अजिबात बाऊ करणार नाहीत. कारण बाकी सगळ्या ठिकाणी दर वाढलेले असताना ग्राहक फक्त सुरक्षित सेवा मिळण्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. त्यामुळे सर्वांनी ग्राहकांना निर्धोक सेवा द्यावी. आपल्याबद्दलचे ग्राहकांचे मत बदलावे. दशरथ आणि रोशन हे नाभिक संघटनेतील हिरे आहेत, त्यांनी सतत चमकत राहावे असे सांगून दोघांचे बुके देऊन जिल्ह्याच्या वतीने आभार मानले.
मालवण तालुका पदाधिकारी जगदीश चव्हाण म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांच्या मनातील भीती जाणे गरजेचे आहे, ही भीती घालवायची असेल तर नाभिक व्यावसायिकांनी युज अँड थ्रो साहित्याची सवय लावायलाच हवी. तसेच सुजाण ग्राहकांनी देखील सुरक्षित सेवा मिळण्यासाठी नाभिक व्यावसायिकांकडे Use & आग्रह धरला पाहिजे. दरवाढीप्रमाणे कारागिरांनी आपल्या कामाचा दर्जा सुधारला पाहिजे.
नाभिक संघटनेच्या या स्वच्छताविषयक सवयीच्या उपक्रमाविषयी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून नाभिक बांधवांनी देणगीदारांचे मनापासून आभार मानले आहेत.
प्रवासादरम्यान कुडाळ तालुक्यातील पाट येथील विशाल मनोहर चव्हाण या नाभिक बांधवाचे सलून वादळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने पडझड झाली आहे असे समजले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन भेट घेऊन विचारपूस केली.















































