Saturday, August 31, 2024

जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मा. निलेश राणे साहेब यांच्याकडून सन्मान

🛑 जिल्हा सौंदर्य चिकित्सा शिबिर / सेमिनार : 

पावशी : दिनांक : ३१ ऑगस्ट २४ : 

          महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत आयोजित जिल्हा सौंदर्य चिकित्सा शिबिरामध्ये सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांची उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. 

          त्यामध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सन्माननीय गणेश चव्हाण यांनी केलेले सूत्रसंचालन अधिक लक्षात राहण्यासारखे होते. राज्य प्रांत संघटक सन्माननीय विजय चव्हाण साहेब, राज्य सरचिटणीस प्रदेश सन्माननीय राजनजी पवार साहेब जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण साहेब, जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर साहेब , जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा चव्हाण मॅडम , माजी जिल्हाध्यक्ष अनिलजी अणावकरसाहेब, जिल्हा खजिनदार कार्याध्यक्ष चंद्रशेखरजी चव्हाण साहेब, जिल्हा उपाध्यक्ष दाजी माने साहेब आणि असे अनेक सन्माननीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

          स्काय न्यूज टुडे यांनी थेट प्रक्षेपण लावले होते. त्यामुळे सर्वजण घरात बसून सुद्धा हे सौंदर्य कला प्रशिक्षण पाहू शकत होते त्यामुळे त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करीत आहोत. सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सन्माननीय सचिन टक्के साहेब , सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सन्माननीय तुषार जी चव्हाण साहेब, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सन्माननीय प्रसादजी चव्हाण साहेब आणि अनेक सौंदर्य क्षेत्रातील दिग्गज आर्टिस्ट उपस्थित होते. या प्रशिक्षणाला असंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

          सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अनेकांचे समारंभ पूर्वक मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. शेवटी कुपन उघडून लकी ड्रॉ काढण्यात आला. 

          सन्माननीय माजी खासदार निलेश राणे साहेब यांनी नाभिकांबद्दल गौरव उद्गार काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाभिक भवन असावे या संदर्भातही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिकांना  शब्द दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक सहसा आमच्याकडे कोणतेही मागणीचे प्रस्ताव घेऊन येत नाहीत असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण माझ्या भावासारखे आहेत असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण कधीही वैयक्तिक मागणी करत नाहीत,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांनी केलेली मागणी रास्त आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत आणि तुमच्या सोबत आहे असे म्हणून त्यांनी सर्व नाभिकांची मने जिंकली. सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे यांच्या उपस्थितीबद्दल आणि त्यांनी नाभिकांबद्दल काढलेल्या गौरव उद्गारांबद्दल  समस्त सिंधुदुर्ग नाभिकबांधव त्यांचे ऋणी राहतील यात कोणतीही शंका नाही. 

©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )

🔸 तालुका सरचिटणीस, 

कणकवली तालुका नाभिक संघटना 










Saturday, May 20, 2023

🛑 श्रीदेवी भैरवी देवालयाचा चौदावा वर्धापनदिन सोहळा संपन्न

 🛑 श्रीदेवी भैरवी देवालयाचा चौदावा वर्धापनदिन सोहळा संपन्न 

🔹 महाराष्ट्र नाभिक महामंडळ मालवण शहर यांचा उपक्रम

🔹मालवण : दि. २० /०५ / २०२३ 

          वर्धापन दिन सोहळ्याला श्रीसत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्य प्रांत संघटक श्री. विजय सिताराम चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष श्री.आनंद आचरेकर, मालवण तालुका कार्यकारिणी सदस्य, जगदीश वालावलकर, अंकुश चव्हाण,उदय चव्हाण, उद्देश चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष सौ.प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्ष सौ.दिपाली शिंदे, सचिव सौ.विशाखा चव्हाण , कार्याध्यक्ष सौ. अश्विनी आचरेकर तसेच महिला कार्यकारिणी व बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते.