झाराप : दिनांक ९ ऑगस्ट २०२१ : यंदा झालेल्या पूरपरिस्थिती मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी माणसे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत.माणगाव बेनवाडी येथील नाभिक बांधव संतोष गणपत कदम यांनी पुराच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तिघांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालून प्राणदानाचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
त्याबद्दल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने संतोष कदम यांना ' जिल्हा नाभिक शौर्य पुरस्कार ' देत शाल , श्रीफळ , सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मान्यवरांच्या शुभहस्ते झाराप येथे सत्कार करण्यात आला.
संतोष कदम यांना ' प्राणदाता नाभिक भ्राता ' ही जिल्हास्तरीय पदवी देण्यात आली.
त्यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजन पवार , जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , नाभिक नेते जगदिश चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , जिल्हा महिलाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर , सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव चव्हाण , रुपेश पिंगुळकर , नितेश पिंगुळकर , दिपाली शिंदे , जय भवानी सेवा मंडळाचे मुख्य कार्यवाह दशरथ चव्हाण , उपाध्यक्ष रोशन चव्हाण आणि कणकवली , कुडाळ, मालवण व सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शशिकांत चव्हाण यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसभा घेण्यात आली.त्यावेळी आनंद आचरेकर, वैभव चव्हाण, जगदिश चव्हाण, अनिल अणावकर आणि विजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर बांदा व धवडकी परिसरातील पूरग्रस्त २२ नाभिक बांधवांसाठी सलून व्यवसायाचे अत्यावश्यक साहित्य ' एक मदतीचा हात ' म्हणून भेट देण्यात आले. त्यावेळी उपस्थित पुरग्रस्तांनी संघटनेच्या मदत कार्याचे कौतुक केले व आभार मानले.
या कार्यक्रमाला सावंतवाडी, कुडाळ व बांदा संघटनेने विशेष सहकार्य केल्याबद्दल जिल्हा सचिव सुधीर चव्हाण यांनी आभार मानले आहेत.













No comments:
Post a Comment