Monday, April 5, 2021

जिल्हा नाभिक भवन साठी संघटनात्मक प्रयत्नांची गरज : विजय चव्हाण


जिल्हास्तरीय सत्कार समारंभात केले प्रतिपादन 

नूतन वित्त आणि बांधकाम सभापती सिंधुदुर्ग यांना जिल्हा नाभिक रत्न पुरस्कार प्रदान 

नूतन समाजकल्याण सभापती यांचाही केला सत्कार 

ओरोस : येथील भवानी देवालयात नुकताच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचा जिल्हास्तरीय सत्कार समारंभ संपन्न झाला. कोविड नियमांचे पालन करून निवडक पदाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत समारंभ संपन्न झाला. त्यावेळी नाभिक समाजातील जिल्हा परिषद सदस्य मा. महेंद्र चव्हाण यांची नूतन वित्त आणि बांधकाम सभापती पदी अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राज्य प्रांत संघटक मा. विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच समाजासाठी आणि  कल्याणासाठी व्रतस्थ असलेले जिल्हा परिषदेचे नूतन समाजकल्याण सभापती मा. अंकुश जाधव यांचाही जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह , शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राज्य प्रदेश चिटणीस मा. राजन पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. 

        त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर , नाभिक नेते मा. जगदिश चव्हाण , ओरोसचे माजी उपसरपंच मा. सुहास परब , भवानी देवालयाचे अध्यक्ष मा. सुभाष कृष्णा चव्हाण , नाभिक महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा मा. प्रतिभा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मा. रुपेश पिंगुळकर, जिल्हा खजिनदार मा. चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सहखजिनदार मा. किशोर पिंगुळकर, जिल्हा संघटक मा. किशोर लाड, कुडाळ तालुकाध्यक्ष मा. आनंद पिंगुळकर, मालवण तालुकाध्यक्ष मा. आनंद आचरेकर , माजी जिल्हा सदस्य मा. शांताराम वेतुरेकर, माजी सावंतवाडी तालुकाध्यक्ष मा. सदानंद पवार, जिल्हा सदस्या मा. रचना चव्हाण , प्रसिद्धीप्रमुख व पत्रकार मा. गणेश चव्हाण , जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व संघटनेचे निवडक शिलेदार उपस्थित होते. 

        त्यावेळी मा. विजय चव्हाण म्हणाले, " आमच्या नाभिक समाजातील एक व्यक्ती जिल्हा परिषदेच्या एका महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्याबद्दल आम्हा सिंधुदुर्ग नाभिक जनतेला सार्थ अभिमान आहे. मा. महेंद्र चव्हाण हे आमची शान आहेत. ते आमच्या नाभिक समाजाच्या हितासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करतील. "

        मा. अनिल अणावकर म्हणाले , " गेल्यावर्षीही मा. महेंद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या निधीमधून गरजू व होतकरू नाभिक सलून व्यावसायिकांसाठी खुर्च्या व इतर सलूनोपयोगी वस्तू मिळण्यासाठी विषय मांडला  होता. या गोष्टीचा ते नक्कीच पाठपुरावा करतील. मा. महेंद्र चव्हाण यांची निवड वित्त व बांधकाम सभापती पदी झाली हि गोष्ट आमच्यासाठी कायमच भूषणावह असणार आहे. आमची संघटना  कायमच पाठीशी असणार आहे. "

        मा. जगदीश चव्हाण म्हणाले , " आमच्या नाभिक ज्ञातिबांधवांसाठी ' जिल्हा नाभिक भवन ' होणे ही काळाची गरज आहे. आमचे ते एक स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी सत्कारमूर्ती मा. महेंद्र चव्हाण आणि मा. अंकुश जाधव यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने आमच्या नाभिक भवनासाठी भरीव आर्थिक तरतूद मिळवून द्यावी. " 

        सत्काराला उत्तर देताना मा. महेंद्र चव्हाण म्हणाले , " जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने ' जिल्हा नाभिक रत्न पुरस्कार ' देऊन सन्मानित केल्याबद्दल मी आपला कायमच ऋणी राहीन. आपल्या नाभिक बांधवांच्या विकासासाठी मी माझ्या परीने जास्तीतजास्त प्रयत्न करेन. खासदार मा. नारायण राणे , माजी खासदार निलेश राणे आणि आमदार मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने मी ' जिल्हा नाभिक भवन ' संदर्भातही प्रयत्न करीन असे नुसते आश्वासन न देता त्यासाठी ठोस प्रयत्न करेन. 

        हृदय सत्काराला उत्तर देताना मा. अंकुश जाधव म्हणाले, " जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने माझा आज जो सत्कार झाला तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. मी हा सत्कार कधीही विसरू शकत नाही व तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. या सत्काराने आमची जबाबदारी आता दुप्पट वाढली आहे. देवी भवानी मातेच्या कृपेने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कायमच कटिबद्ध असेन. "

        त्यानंतर जिल्हा सचिव मा. सुधीर चव्हाण व जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर यांच्या वतीने दोन्ही सभापतींना लेखी निवेदन देण्यात आले. कणकवली नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले. 


        


No comments:

Post a Comment