🔴 सिंधुदुर्ग नाभिक संघटनेची जिल्हा सभा संपन्न
मालवण :
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सिंधुदुर्ग शाखेची सभा मालवण येथील भैरवी मंदिरात संपन्न झाली. त्यावेळी राज्य प्रदेश सरचिटणीस राजन पवार , राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण , जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण , जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , महेश परुळेकर , कणकवली महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल , कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण , ज्येष्ठ नागरिक कारीवडेकर , वेतूरकर , निवृत्त शिक्षक बाळकृष्ण लाड , मालवण नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण , जिल्हा प्रसिध्द प्रमुख गणेश चव्हाण , मालवण महिलाध्यक्षा दिपाली शिंदे , कुडाळ महिलाध्यक्षा विद्या चव्हाण , कणकवली महिला सचिव हेमांगी अणावकर , सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार , कणकवली तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण , कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर , निवृत्त शिक्षक व कणकवली नाभिक कर्मचारी तालुकाध्यक्ष दिगंबर चव्हाण , जिल्हा महिला सदस्या रचना चव्हाण , रुपेश पिंगुळकर , किशोर पिंगुळकर , किशोर लाड , दाजी माने चंद्रकांत चव्हाण , विठोबा चव्हाण आणि सर्व तालुक्यातील मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या वतीने सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महेश परुळेकर यांनी नाभिक समाजाच्या विकासासाठी सर्व्हेक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 31 मे पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व्हेक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने तालुकाध्यक्ष यांनी तालुकावार सभा घेऊन माहिती देण्यासाठी ठराव घेण्यात आला.
मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. मागील झालेल्या खर्चास मंजुरी घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. नवीन महिला कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांची पुनर्निवड झाली. नवीन पदाधिकारी म्हणून उपाध्यक्षा अलिशा वेतुरकर , कार्याध्यक्षा विद्या चव्हाण , खजिनदार शिवानी चव्हाण , जिल्हा कार्यालयीन चिटणीस व सल्लागार विशाखा चव्हाण , रचना चव्हाण यांची निवड करण्यात आली. सर्व महिला तालुकाध्यक्षा यांचीही कार्यकारिणी सदस्या म्हणून निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून तळगावचे जगदिश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी नवे जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण यांचा शाल देऊन सत्कार केला. लवकरच जिल्ह्याची सर्वसाधारण सभा घेऊन इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे. आनंद आचरेकर , अश्विनी आचरेकर आणि आशा चव्हाण यांनी भोजनाची उत्तम सोय केल्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. विजय चव्हाण , अनिल अणावकर , सुधीर चव्हाण यांनी सर्वांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. दिगंबर चव्हाण , सदानंद पवार , जगदिश चव्हाण , आनंद पिंगुळकर , अलिशा वेतूरकर , बाळकृष्ण लाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.






















































































































अतिशय सुंदर page , Photography अप्रतिम कार्यक्रम डोळ्यासमोर उभा झाला धन्यवाद
ReplyDeleteThanks for reply.
ReplyDelete