Sunday, January 22, 2023

🛑 आमचे नाभिक रत्न अनिल अणावकर साहेब

🛑 आमचे नाभिक रत्न अनिल अणावकर साहेब

          मी गेली अनेक वर्षे अनिल अणावकर साहेब यांच्या सहवासात आहे. कणकवली नाभिक संघटनेच्या सचिव पदासाठी माझे नाव सुचवणारे अनिल अणावकरसाहेब. त्यांनीच मला संघटनेत ओढून घेतले. मी ओढला गेलो. जिल्हा नाभिक संघटनेत कोणतेही पद नसल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष मा. कल्याणराव दळे यांनी जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्षच बनवले. अर्थात हा आग्रहही जिल्हाध्यक्ष अनिल साहेबांचाच.

          मा.अनिल अणावकर आणि त्यांच्या जिल्हा कमिटीचा माझ्यावर असलेला विश्वास हेच त्याचे मुख्य कारण आहे. 

          अनिल हेअर ड्रेसर्स नावाचे कणकवली शहरातील वातानुकूलित पहिले वहिले सलून अणावकर साहेबांचेच. दुकानाची प्रशस्त जागा , अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन नाभिक सेवा देत असताना समाजसेवेचे व्रत जोपासणारे अनिल अणावकरसाहेब.

          नाभिक बांधवांच्या दुःखद प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत धावून जाणारा नाभिक नेता म्हणजे अनिल अणावकरसाहेब. मैत्री जोपासणारा जिव्हाळ्याचा मित्र म्हणजे अणावकर साहेब. 

          सलून कारागिरांना सुयोग्य मार्गदर्शन करावे ते अनिल अणावकरांनीच. ज्या गोष्टी त्यांना सांगाव्याश्या वाटतात त्या ते सांगितल्याशिवाय राहत नाहीत. काहींना त्यांची परखड मते पटली नसली तरी ते सांगत राहतात. स्वतः अनिल अणावकर साहेब सलून क्षेत्रात अनुभवी केशकर्तनकार आहेत त्यामुळेच ते असे मार्गदर्शन करत राहतात. आपल्याला ठेच लागलेली आहे , ती दुसऱ्याला बसू नये अशी त्यांची निर्मळ भावना असते. ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अर्थात ते सर्वांच्या भल्यासाठीच सांगत असतात. आपले वय झाल्यानंतरही आपल्याला नाभिक व्यवसाय न कुरकुरता करता यायला हवा हा त्यांचा मुख्य हेतू असतो. 

          विविध उपक्रम राबवताना नाभिकांना एकत्र आणता यावे या जाणिवेतून त्यांचे उपक्रम सुरु असतात. नाभिकांनी खुश होऊन आपला व्यवसाय गुण्यागोविंदाने करत राहावा असे त्यांना सतत वाटत असते. 

          अणावकर गुरुजींचा पुत्र म्हणून त्यांची ओळख असली तरी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख नाभिक जनातच नव्हे तर सर्व जिल्ह्यात निर्माण केली आहे. 

          आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा. श्रीदेवी भवानी माता त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करील याची खात्री आहे. 

©️ प्रवीण कुबलसर

( 9881471684 )




No comments:

Post a Comment