Wednesday, March 9, 2022

🛑 नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेणेबाबत पंतप्रधान यांना दिले निवेदन

🛑 नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेणेबाबत पंतप्रधान यांना दिले निवेदन
🟢 जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केले निवेदन सुपूर्द
🟣 सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा केला जाहीर निषेध
🔴 सिंधुदुर्गनगरी :

          हल्लीच जालना येथील एका भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाला अपमानास्पद वाटेल अशा प्रकारचे वक्तव्य करुन राज्यातीलच नव्हे तर देशभरातील समस्त नाभिक बांधवांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रावसाहेब यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात व्यक्त केली आहे. 
          महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी रावसाहेब दानवेंच्या नाभिक समाजाबद्दलच्या अवमानजनक भाषणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
          रावसाहेब दानवे यांनी देखील नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व नाभिक समाजाची लेखी व जाहीर माफी मागावी अशीही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. 
          यापूर्वीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाभिक समाजाला लाज वाटेल असे वक्तव्य केले होते , त्यावेळी नाभिक समाजाने मोठे आंदोलन छेडले होते. ते यशस्वीपणे पार पडले होते. त्यानंतर फडणवीस यांनी लेखी व जाहीर माफी मागितली होती. 
          निवेदन देताना सिधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण , राज्य प्रदेश सरचिटणीस राजन पवार , जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर , सुभाष चव्हाण , जगदिश चव्हाण , बंटी चव्हाण , अरुण चव्हाण , दाजी माने , आनंद आचरेकर आणि कणकवली , सावंतवाडी , कुडाळ , मालवण येथील तीसपेक्षा जास्त नाभिक तालुका  पदाधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment